मुंबई, दि. ८ : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानी रविवारी कोब्रा जातीचा नाग आढळून आला. मातोश्री बंगल्यावरच्या कर्मचाऱ्यांना हा नाग दिसला. त्यानंतर तात्काळ सर्पमित्रांना तसेच वन्यजीव संरक्षण आणि मदत पथकाला पाचरण करण्यात आले. सर्पमित्रांनी मोठ्या शिताफीने या नागाला पकडले आणि जंगलात सोडले. मातोश्री बंगल्यातील पाण्याच्या टाकीमध्ये हा नाग लपून बसला होता.

हा नाग पकडला गेल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी सर्पमित्रांचे आभार मानले. मातोश्री बंगल्यात नाग शिरल्याची बातमी उद्धव ठाकरे यांना कळली तेव्हा ते तातडीने बाहेर आले.

त्यांनी या नागाला रेसक्यू करण्याची जी प्रक्रिया होती ती पाहिली. किंग कोब्रा या जातीचा हा नाग जवळपास चार फुटांचा होता. हा विषारी जातीचा साप असल्याची माहिती सर्पमित्रांनी दिली.
Photo: viral
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा