Ticker

6/recent/ticker-posts

विधानसभेचे विशेष अधिवेशन ३ व ४ जुलै रोजी

अध्यक्षपदासाठी अर्ज करण्याची मुदत २ जुलै दुपारी १२ पर्यंत

मुंबई, दि. २ : महाराष्ट्र विधानसभेचे दोन दिवसीय विशेष अधिवेशन रविवार, दिनांक ३ जुलै आणि सोमवार, दिनांक ४ जुलै, २०२२ रोजी आयोजित करण्यात आले आहे. या अधिवेशनात विधानसभा अध्यक्षपदाची निवड करण्यात येणार आहे. अध्यक्षपदासाठी अर्ज सादर करण्याची मुदत शनिवार, दिनांक २ जुलै रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत आहे. तर, विधानसभा अध्यक्षपदाची निवड रविवार, दिनांक ३ जुलै रोजी सभागृहात होईल. विधानसभेच्या सर्व सन्माननीय सदस्यांनी या विशेष अधिवेशनास उपस्थित रहावे, असे आवाहन विधानमंडळ सचिवालयाने केले आहे.



1919

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या