राज्यपाल, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचे अतिरेकी हल्ल्यातील पोलीस हुतात्म्यांना अभिवादन - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

रविवार, २६ नोव्हेंबर, २०२३

demo-image

राज्यपाल, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचे अतिरेकी हल्ल्यातील पोलीस हुतात्म्यांना अभिवादन

मुंबई, दि. २६ : राज्यपाल रमेश बैस यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेसह मुंबई पोलीस आयुक्त कार्यालय परिसरातील पोलीस हुतात्मा स्मारक येथे पंधरा वर्षांपूर्वी अतिरेकी हल्ल्यात हौतात्म्य प्राप्त झालेल्या पोलीस अधिकारी व जवानांना पुष्पचक्र वाहून आपली श्रद्धांजली वाहिली. 

IMG-20231126-WA0034

IMG-20231126-WA0036

IMG-20231126-WA0037

भावपूर्ण वातावरणात झालेल्या या कार्यक्रमात पोलीस बँड पथकाने ‘सलामी शस्त्र’ व 'बिगुलर लास्ट पोस्ट' वाजविले. यावेळी सर्व मान्यवरांनी तसेच गणवेशातील अधिकारी व पोलीस जवानांनी हुतात्म्यांना सलामी दिली.


हुतात्म्यांना पुष्पचक्र वाहिल्यानंतर राज्यपालांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्यासह हुतात्मा पोलीस कुटुंबातील सदस्यांची भेट घेतली.


यावेळी मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, अपर मुख्य सचिव (गृह) सुजाता सौनिक, राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ व मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी देखील हुतात्म्यांना अभिवादन केले.


यावेळी वरिष्ठ पोलीस अधिकारी तसेच सेवा निवृत्त पोलीस अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन मुंबई पोलिसांतर्फे करण्यात आले होते. 

Press note

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

पेज

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *