मुंबई : विवेक फणसळकर यांनी संजय पांडे यांच्याकडून पोलीस आयुक्त पदाचा पदभार स्वीकारला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना फणसळकर यांनी मुंबईच्या सुरक्षिततेसाठी प्राधान्य होते आणि राहील असे सांगितले.
कायदा व सुव्यवस्था, वाहतूक आणि दहशतवादाचा धोका अशी आव्हाने मुंबईसमोर कायम आहे. पण, मुंबई पोलिसांनी नेहमी शहराचे वातावरण सुरक्षित ठेवले असून यापुढेही त्यात कोणतीही तडजोड होणार नाही. महिला, बालके, ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी जी काही चांगली कामे करता येतील ते आपण करणार. जगात मुंबई पोलिसांचा नावलौकिक आहे. त्याला तडा जाणार नाही. उलट पोलिसांचा नावलौकिक आणखी कसा चांगला होईल हे आम्ही आमच्या कामातून दाखवून देऊ असा विश्वास फणसळकर यांनी व्यक्त केला. पोलिस दलात ज्या काही चांगल्या योजना सुरू केल्या त्या चालूच राहतील. नागरिकांना चांगल्या सुविधा देणे, पोलीस ठाण्यात चांगली वागणूक मिळणे, त्यांचे प्रश्न सोडविणे बरोबरच पोलिसांकडून संयमाने काम कसे केले जाईल यावर आमचा भर राहील असेही फणसळकर म्हणाले. तसेच मुंबई पोलीस आयुक्तपदासाठी माझी नियुक्ती केली त्याबद्दल शासनाचे आभार देखील त्यांनी मानले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा