पेडर रोड येथे दरड कोसळली - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

शनिवार, २ जुलै, २०२२

demo-image

पेडर रोड येथे दरड कोसळली

मुंबई : मुंबईत पावसाळ्यातील पडझडीला सुरुवात झाली आहे. कुर्ला येथे इमारत कोसळून घडलेली दुर्घटना ताजी असतानाच शुक्रवारी मध्यरात्री पेडर रोड येथील मलबार हिलवरील एक दरड कोसळली. या घटनेत कोणीही जखमी झालेले नाही. दरड कोसळण्याच्या हादऱ्याने जवळच्या रस्त्याला तडे गेले आहेत.

Land%20Slide%20at%20Cadbary%20House%20Opp%20Mahalaxmi%20Temple%201


पेडर रोड येथील कॅडबरी हाऊस या इमारतीच्या जागी पुनर्विकास सुरू आहे. बांधकाम करण्यासाठी येथे मोठा खड्डा करण्याचे काम सुरू होते. या प्रस्तावित इमारतीच्या मागच्या बाजूला मलबार हिल आहे. शुक्रवारी रात्री पावसात टेकडीवरील दरड कोसळून फाउंडेशनच्या खड्ड्यात येऊन पडली. सकाळपर्यंत टेकडीवरून माती कोसळत होती. या दुर्घटना स्थळाची गर्भशास्त्रज्ञ व आयआयटीच्या तज्ञांकडून तपासणी करून घेणार असल्याची माहिती पालिकेच्या डी विभागाचे आयुक्त यांनी दिली आहे.

Land%20Slide%20at%20Cadbary%20House%20Opp%20Mahalaxmi%20Temple


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

पेज

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *