सायबर गुन्हे, गुन्हे शाखा, मुंबई यांचेकडून जनतेस आवाहन - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

रविवार, २६ डिसेंबर, २०२१

demo-image

सायबर गुन्हे, गुन्हे शाखा, मुंबई यांचेकडून जनतेस आवाहन

नवीन वर्ष व ख्रिसमसच्या अनुषंगाने हॉटेल-रेस्टॉरंट बुकिंग, ऑनलाईन जेवण व वाईन शॉप च्या बनावट जाहिरातींपासून सावधान


नवीन वर्ष व ख्रिसमसच्या अनुषंगाने नागरीकांकडुन मोठ्या प्रमाणात ऑनलाईन हॉटेल--रेस्टॉरंट बुकींग, जेवण, वाईन ऑर्डर केले जातात. फेसबुक व इतर सोशल मिडीयाच्या माध्यमांतुन प्रतिष्ठीत, नावलौकीक हॉटेल्स--रेस्टॉरंट चा वापर करून बुकींग मध्ये सवलत, एका थाळीवर दोन थाळी मोफत अशा प्रकारच्या खोट्या जाहीराती दिल्या जातात. इंटरनेट माध्यमावर सायबर गुन्हेगांरानी गुगल एडिटचा वापर करून प्रसिद्ध वॉईन शॉप, रेस्टॉरंट, हॉटेल्सचे नंबर यामध्ये बदल करुन ऑनलाईन फसवणुक केल्याच्या घटना घडलेल्या आहेत. त्यामुळे येणारे नवीन वर्ष व ख्रिस्तमसच्या पार्श्वभुमीवर ऑनलाईन बुकींग करताना सावधानता बाळगावी.


> ऑनलाईन माध्यमातून हॉटेलस्, लॉजेस, रेस्टारंट बुकींग करताना किंवा जेवण ऑर्डर करताना त्या वेबसाईट अधिकृत असल्याची खात्री करावी तसेच त्यावर देण्यात आलेल्या संपर्क क्रमांकाची खात्री करूनच ऑर्डर द्यावी.


> यापूर्वी नवीन वर्ष व ख्रिस्तमसच्या पार्श्वभुमीवर बनावट, लोभस ऑनलाईन जाहिरातीद्वारे फसवणुकीचे प्रकार घडलेले आहेत. त्यामुळेच सोशल मीडियावर  येणाऱ्या ऑफर्सच्या link वर क्लिक करू नये. तसेच अशा संकेतस्थळावरती देण्यात आलेले फॉर्ममध्ये कोणतीही वैयक्तिक माहिती देऊ नये.


> आपल्या बॅक खात्याशी संबंधित गोपनीय माहिती कोणाशीही शेअर करू नये किंवा ओ.टी.पी. शेअर करू नये. त्याद्वारे आपल्या संदर्भात ऑनलाईन फ्रॉड होवुन आर्थिक नुकसान होण्याचा धोका संभवतो.


> Cyber frauder यांनी Any Desk, Team Viewer अश्या प्रकारच्या लॅपटॅप, मोबाईलची स्क्रिन शेअर करणारी ऍप्लिकेशन डाऊनलोड करण्यास सांगितल्यास ती करू नये. त्याद्वारे आपल्या मोबाईलमध्ये आपण करीत असलेल्या सर्व कृती cyber frauder ला कळुन तो आपली गोपनिय, संवेदनशिल माहिती मिळवुन त्याचा गैरवापर करण्याचा व फसवणुक होण्याचा धोका संभवतो. त्यामुळे अश्याप्रकारची मागणी करणाऱ्या cyber frauder चा मोबाईल कमांक तात्काळ ब्लॉक करावा.


> Cyber frauder सुरवातीस QR Code स्कॅन करण्यास सांगुन आपल्या खात्यावर ०१ रूपये जमा करतात व नंतर आपल्या खात्यातून रक्कम काढुन घेतात त्यामुळे असे कोणतेही QR code स्कॅन करू नये.


> अशाप्रकारे कोणाची फसवणूक झाल्यास किंवा फसवणूकीचा प्रयत्न झाल्यास सदरबाबत तात्काळ स्थानिक पोलीसांशी संपर्क साधावा.


.com/img/a/






Press note

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

पेज

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *