Ticker

6/recent/ticker-posts

सायबर विभाग, गुन्हे शाखा, मुंबई यांचेकडून नागरिकांना आवाहन

देशातील व महाराष्ट्रातील काही भागात घडलेल्या अप्रिय घटनेच्या अनुषंगाने धार्मिक भावना भडकविण्याऱ्या काही आक्षेपार्ह पोस्ट, खोटया बातम्या प्रसारीत करणारे ऑडिओ/व्हिडीओ व संदेश सोशल मिडीयावर व्हायरल होत आहेत. अशाप्रकारच्या पेस्ट ऑडिओ व्हिडीओ फॉरवर्ड करू नये. अशा आक्षेपार्ह पोस्ट प्राप्त झाल्यास त्या-त्या समाज माध्यमांवर रिपोर्ट करावे. सामाजिक शांतता भंग करणारे, समाजविघातक व्हिडीओ, पोस्ट, संदेश, सोशल मिडीयावर व्हायरल करणे कायद्याने गुन्हा आहे. अशा प्रकारच्या पोस्ट व्हिडीओवर लक्ष ठेवण्याबाबत फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर, व्हॉट्सअप इत्यादी सर्व सार्वजनिक माध्यमांना कळविण्यात आले आहे. सोशल मिडीया व इंटरनेटच्या माध्यमातुन पोस्ट करताना सामाजिक भान ठेवत माहिती तंत्रज्ञान अधिनिय २०००, (1.7. 801 2000) मधील तरतुदींचे काटेकोरपणे पालन करावे. 

व्हॉट्सअप वापरणारे/ग्रुप मध्ये असणारे सर्व सदस्य विशेषतः: ग्रुप अँडमिन्सनी आपल्या ग्रुपमध्ये अशा प्रकारचे पोस्ट किंवा व्हिडीओ प्रसारीत होणार नाहीत याची विशेष दक्षता घ्यावी.

कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवु नये. सायबर विभाग गुन्हे शाखा, मुंबई यांचेकडुन सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, अशा प्रकारचे धार्मिक भावना भडकविणारे व खोटया बातम्या प्रसारीत करणारे व्हिडीओ किंवा पोस्ट प्रसारीत करून नये. तसेच अशा प्रकारचे आक्षेपार्ह व्हिडीओ, पोस्ट करताना कोणीही आढळुन आल्यास त्याची माहिती त्वरीत नजिकच्या पोलीस ठाणेस देण्यात यावी.















प्रेस नोट

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या