शाळा ४ ऑक्टोबरपासून उघडणार
मुंबई : मार्च दोन हजार वीस पासून बंद असलेल्या मुंबईतील शाळा आता चार ऑक्टोबरपासून उघडणार आहेत शहरात इयत्ता आठवी ते बारावी तर ग्रामीण भागात इयत्ता पाचवी ते बारावी चे वर्ग भरविण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे.
शाळांबाबतच्या यापूर्वीच्या निकषांमध्ये बदल करण्यास टास्क फोर्सने मान्यता दिली आहे. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी केलेल्या या घोषणेचे राज्यातील विविध सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी त्यासोबतच शिक्षकांनी, शिक्षण संस्थाचालकांनी स्वागत केले आहे.
सह्याद्री अतिथीगृहावर शुक्रवारी राज्यातील शैक्षणिक सुधारणांसाठी डिजिटल शिक्षणाच्या विविध पर्यायांवर चर्चा झाली. त्याच दरम्यान राज्यातील शाळा सुरू करण्यासंदर्भात सरकारने सकारात्मक भूमिका घेतल्याने शालेय शिक्षण मंत्री गायकवाड यांनी ४ ऑक्टोबर पासून राज्यात शाळा सुरू करण्याची घोषणा केली. या शाळा ७ जुलै आणि १० ऑगस्ट रोजी जाहीर केलेल्या शासन निर्णयामधील मार्गदर्शक सूचना आणि राज्य टास्क फोर्सने केलेल्या सूचनांचा विचार करून सुरू केल्या जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
शाळांसाठीचे नियम :
- प्रत्येक शाळेमध्ये आरोग्य तपासणी केंद्र सुरू करावे. यामध्ये स्थानिक आरोग्य केंद्रांमध्ये डॉक्टर व नर्सची मदत घ्यावी. विद्यार्थ्यांचे नियमितपणे तापमान तपासण्यासाठी डॉक्टर पालकांची मदत घ्यावी.
- शाळेत येताना मुलांना शाळेत पायी येण्यासाठी शिक्षकांनी प्रोत्साहित करावे. ज्या शाळांमध्ये स्कूल बस, खासगी वाहनांमधूम विद्यार्थी येतात अशा वाहनांमध्ये एका आसनावर एकच विद्यार्थी बसून प्रवास करेल याची दक्षता घेण्यात यावी.
- विद्यार्थ्यांनी गृहपाठ ऑनलाइन सादर करण्याबाबत निर्देश द्यावे जेणेकरून विद्यार्थ्यांमध्ये पुस्तकांची अदलाबदल होणार नाही. वेळ आल्यास गृहपाठ शक्यतो वर्गामध्ये करून घ्यावा. सद्यस्थिती कोणत्याही प्रकारचे खेळ खेळण्यात येऊ नयेत.
- ताप, सर्दी, जोरात श्वासोच्छ्वास करणारे, शरीरावर ओरखडे, लाल डोळे झालेले, ओठ फुटलेले व लाल झालेले, बोटे, हात आणि सांधे सुजलेले, उलट्या, जुलाब, पोटदुखी असलेले विद्यार्थी वर्गात असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांना डॉक्टरकडे नेण्याची व्यवस्था करावी व डॉक्टरांच्या सल्ल्याने विद्यार्थ्यांच्या उपस्थितीबाबत निर्णय घ्यावा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा