शेअर मार्केट वधारले... - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

शनिवार, २५ सप्टेंबर, २०२१

demo-image

शेअर मार्केट वधारले...

 सेन्सेक्सची उसळी

मुंबई : जागतिक भांडवल गुंतवणूक परीघात मुंबई शेअर बाजाराने (बीएसई) जोरदार मुसंडी मारत सर्वच प्रमुख शेअर बाजारांना शुक्रवारी चारीमुंड्या चीत केले आणि बीएसईचा निर्देशांक असलेल्या सेन्सेक्सने ऐतिहासिक ६० हजारांची पातळी ओलांडली. 


भांडवली गुंतवणूकदारांनी मोठ्या विश्‍वासाने दिलेले गुंतवणुकीचे 'बॅटन' सांभाळत सेन्सेक्सने देशातील निर्बंध, कोरोनाची पहिली व दुसरी लाट, अर्थव्यवस्थेला आलेली मरगळ अशा अडथळ्यांची शर्यत यशस्वीरित्या पार केली. त्यामुळे भारतीय भांडवल बाजारात  गुंतवणूकदारांचा विश्‍वास आणखी दृढ होण्यास मदत मिळाली.


मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स शुक्रवारी दिवसअखेर  १६३.११ अंक वधारत ६०,०४८.४७  या स्तरावर बंद झाला. जागतिक भांडवल बाजारात निराशेचे वातावरण असतानाही गुंतवणूकदारांनी बँकिंग, फायनान्स व वाहन कंपन्यांच्या समभागांची मोठ्या प्रमाणावर खरेदी केली.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

पेज

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *