Ticker

6/recent/ticker-posts

महिला पोलिसांना आठ तास ड्युटी द्या

मुंबई : महाराष्ट्र पोलीस दलातील महिला कर्मचाऱ्यांच्या कामाचे तास १२ वरून ८ वर आणण्याचा महत्त्वाचा निर्णय शुक्रवारी जाहीर करण्यात आला. या निर्णयामुळे महिला पोलीस कर्मचाऱ्यांत आनंदाचे वातावरण आहे.

पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी ही माहिती शुक्रवारी दिली. नागपूर शहरात महिला पोलिसांना प्रायोगिक तत्त्वावर आठ तास ड्युटीचा उपक्रम सुरू केल्यानंतर पोलिस महासंचालक संजय पांडे यांनी सर्वच ठिकाणी असा विचार करावा अशी सूचना केली होती.

त्यानंतर पुणे ग्रामीण पोलिसांनी व नंतर अमरावती शहर पोलिसांनी तसा निर्णय घेतला आता अखेर राज्य पातळीवर त्याची अंमलबजावणी करण्यात  येणार आहे.

हा अतिशय चांगला निर्णय असून यामुळे आणि महिला पोलीस कर्मचाऱ्यांना कुटुंब आणि नोकरी यामध्ये उत्तम ताळमेळ साधता येईल अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली आहे. राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर यांनीही या निर्णयाचे स्वागत केले आहे.





सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारचे ट्विट करून आभार मानले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या