३७ वर्षांपासून फरार आरोपी रायगडमधून ताब्यात - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

शुक्रवार, १८ एप्रिल, २०२५

demo-image

३७ वर्षांपासून फरार आरोपी रायगडमधून ताब्यात

मुंबई, (दादासाहेब येंधे) : हत्येचा प्रयत्न, बेकायदा शस्त्र बाळगणे असे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या गुंडाला ३७ वर्षांनंतर अटक करण्यात आझाद मैदान पोलिसांना यश आले आहे. पोलिसांना चकवा देण्यासाठी आरोपी मोबाइलचे नेटवर्क नसलेल्या डोंगराळ भागात लपून बसला होता. अखेर आझाद मैदान पोलिसांच्या तडीपार कक्षाने आरोपीला अटक केली आहे.

मंगेश गोविंद मोरे ऊर्फ मंगेश मांजरेकर असे अटक आरोपीचे नाव आहे. तो डोंबिवलीतील शास्त्रीनगर परिसरातील रहिवासी होता. मुंबईतील एका अधिकाऱ्याने सांगितले की, ३७ वर्षांपूर्वीच्या खूनाच्या प्रयत्नाच्या प्रकरणात तो फरारी होता. १९८८ पासून पोलिसांचा चकवा देत आरोपी लपून होता. कोणतीही ठोस माहिती पोलिसांच्या हाती नव्हती. केवळ आरोपीचे मूळ गाव रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील रानवड येथील असल्याची माहिती होती.


आरोपीने ३७ वर्षांपासून त्याचे घरदार सोडले होते. नातेवाईकांशीही संपर्क तोडला होता. त्यामुळे त्याच्याबाबत कोणतीही पोलिसांना मिळत नव्हती. फक्त आरोपीचे मूळ गाव महाड तालुक्यातील रानवड येथील असल्याची माहिती पोलिसांना होती. 


नमुदची घटना ही डि.कंपनीच्या गंगस्टर आरोपींची असल्याने त्याचे गांभीर्य लक्षात घेवुन वरिष्ठ पो.उ.नि. रामप्रसाद चंदवाडे व तडीपार पथकास दिलेल्या सुचनाप्रमाणे नमुद पथकाने कसोशीने गुप्त बातमीदार सक्रिय करून फरारी आरोपीबाबत माहिती प्राप्त केली असता, आरोपी हा जास्त दिवस एकाच ठिकाणी राहत नसल्याबाबत पोलिसांना माहिती मिळाली. त्यामूळे आरोपीचा शोध घेणे जास्त जिकिरीचे होत होते. तरी देखील तडीपार पथकाने हार न मानता चिकाटीने वारंवार माहिती प्राप्त केली असता तो गाव नानेमाची वाकी बुद्रुक ता.महाड जि.रायगड याठिकाणी १५ किलोमीटर आत खूप मोठया डोंगराळ भागात ज्याठिकाणी येण्याजाण्यासाठी अडगळीचा रस्ता आहे व मोबाईल नेटवर्क नसल्यामूळे पोलीस पथकाचा आपआपसांत संपर्क होत नव्हता .तरी देखील शर्थीने आरोपीला सापळा रचून ताब्यात घेवून नमूद गुन्हयांत अटक केली.


मंगेश मांजरेकर हा १९८८ मध्ये दक्षिण मुंबईतील आझाद मैदान पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या खुनाच्या प्रयत्नाच्या प्रकरणात फरार होता तसेच त्याच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट सुद्धा जारी करण्यात आले होते. अखेर पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या.


सदरची कामगिरी ही मा. पोलीस आयुक्त, मुंबई, श्री. विवेक फणसळकर, मा. विशेष पोलीस आयुक्त, मुंबई  श्री. देवेन भारती, मा. पोलीस सह आयुक्त, (का व सु) मुंबई, श्री. सत्य नारायण, मा. दक्षिण प्रादेशिक विभागाचे अप्पर पोलीस आयुक्त, मुंबई श्री. अभिनव देशमुख, पोलीस उप-आयुक्त परिमंडळ ०१ मुंबई, मा.श्री प्रविण मुंढे, मा.सहाय्यक पोलीस आयुक्त आझाद मैदान विभाग, श्रीमती प्रेरणा कटूटे यांच्या मार्गदर्शनाखाली वरीष्ठ पोलीस निरीक्षक, आझाद मैदान पोलीस ठाणे, दिपक कृष्णा दळवी, पोलीस निरीक्षक, श्री ज्ञानेश्वर आव्हाड, पोलीस उपनिरीक्षक रामप्रसाद चंदवाडे, स.फौ. संदीप लोखंडे, पो.शि.क्र.११०८७९ कांबळे, पो.शि.क्र.१३०३६० बोरसे, पो.शि.क्र. १३०३७३ पाटील, मपोशि क्र. १४०८७०. झुंजरे यांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे.

%E0%A4%86%E0%A4%9D%E0%A4%BE%E0%A4%A6%20%E0%A4%AE%E0%A5%88%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A8%20%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%B8%20%E0%A4%A0%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%87%20Press%20Note-11

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

पेज

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *