मुंबई, दादासाहेब येंधे : देशी बनावटीचे पिस्तूल आणि जिवंत काडतुसाची तस्करी करणाऱ्या मो. तलाह सादिक बारमारे वय, २३, राहणार रूम नंबर १८, दुसरा माळा, खलील मंजिल बिल्डिंग, टॅंक बंदर, रामभाऊ भोसले मार्ग, माझगाव) या तरुणाला वडाळा पोलिसांनी वडाळा पूर्वे, भक्ती पार्क, आयमॅक्स सिनेमा जवळ अटक केली. त्याच्या जवळून एक देशी बनावटीचे पिस्टल, एक जिवंत काडतुस असा मुद्देमाल जप्त केला आहे. वडाळा पोलीस ठाण्याच्या पोलिस उपनिरीक्षक दिपाली परदेशी आपल्या पथकासह गस्तीवर असताना त्यांना एक अज्ञात व्यक्ती पिस्तुलांची तस्करी करण्यासाठी वडाळा भक्ती पार्क आयमॅक्स सिनेमा जवळ येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर परदेशी यांनी अन्य कर्मचाऱ्यांसोबत येथे सापळा रचून आरोपीला अटक केली.

0 टिप्पण्या