कठोर निर्बंधात बाप्पा आले - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

ब्रेकिंग

शुक्रवार, १० सप्टेंबर, २०२१

demo-image

कठोर निर्बंधात बाप्पा आले

 कोरोनाची भीती, पण उत्साह कायम

मुंबई : गेल्या दीड वर्षातील मरगळ झटकून टाकत आनंदाच्या वातावरणात मुंबईत ठीकठिकाणी आज गणेश चतुर्थी दिवशी लाडक्‍या बाप्पाचे आगमन झाले मुंबईत ढोल ताशाला बंदी असल्याने गणपती बाप्पाच्या जयघोषात खाजगी गाड्या आणि टॅक्सीमधून घरगुती बाप्पा घरोघरी विराजमान झाले. बाप्पाच्या स्वागतासाठी घरगुती भक्तांसह सार्वजनिक मंडळातील कार्यकर्त्यांमध्ये कोरोनाच्या निर्बंधांमुळे हिरमोड दिसून येत आहे.

भव्य गणेशमूर्ती वाजत-गाजत काढण्यात येणाऱ्या मिरवणुका, प्रचंड गर्दी अशी मुंबईतील गणेशोत्सवाची ओळख. पण, गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही मुंबईकरांना विविध नियमांचे पालन करीत साधेपणाने गणेशोत्सव साजरा करावा लागणार आहे. पुढचे नऊ दिवस मुंबईमध्ये कलम १४४ लागू करण्यात आल्याने पाच किंवा त्याहून अधिक लोकांना एकत्र येण्यास परवानगी नाही . त्यामुळे भाविकांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.

IMG-20210910-WA0017

IMG-20210912-WA0053




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

पेज

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *