चिंचपोकळीचा चिंतामणी यंदाही चांदीच्या स्वरूपात - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

शुक्रवार, १० सप्टेंबर, २०२१

demo-image

चिंचपोकळीचा चिंतामणी यंदाही चांदीच्या स्वरूपात

मुंबई, दादासाहेब येंधे : मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात आपला वेगळा ठसा उमटवणाऱ्या चिंचपोकळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यंदाही गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचे ठरविले आहे. मंडळाच्या वतीने या वर्षीदेखील चांदीच्या स्वरूपातील गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे. गणेश भक्तांनी ऑनलाईन पद्धतीनेच गणरायाचे दर्शन घ्यावे. अशी विनंती मंडळाचे मानद सचिव वासुदेव सावंत यांनी केली आहे.

राज्य सरकारने आखून दिलेल्या नियमांच्या अधीन राहून मंडळ यावर्षी देखील गणेशोत्सव अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करीत आहे. उत्सव काळात कोविड सारख्या महामारीशी लढण्याकरिता घ्यावयाची काळजी तसेच 'स्वच्छ परिसर - सुंदर परिसर' यावर प्रबोधनपर व्याख्यान तसेच आरोग्य शिबिर देखील राबविण्यात येणार आहे.

IMG20210912083058

IMG20210912083112

IMG20210912083119




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

पेज

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *