मुंबईतील
स्थितीचा घेतला आढावा
मुंबईतील पावसाच्या पार्श्वभूमीवर, राज्याचे मुख्यमंत्री श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील आपत्कालीन नियंत्रण कक्षास आज (दिनांक ९ जून २०२१) दुपारी भेट देऊन मुंबई महानगरातील परिस्थितीचा आढावा घेतला. पावसाच्या पाण्याचा निचरा जलदगतीने होण्यासह निरनिराळ्या कार्यवाहीबाबत मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी यावेळी निर्देश दिले.

मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्या या
भेटीप्रसंगी महानगरपालिकेच्या सभागृह नेता श्रीमती विशाखा राऊत, स्थायी समितीचे अध्यक्ष श्री. यशवंत जाधव, महानगरपालिका आयुक्त श्री. इक्बाल सिंह चहल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) श्रीमती आश्विनी भिडे, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) श्री. पी. वेलरासू, सह आयुक्त (महानगरपालिका आयुक्त कार्यालय) श्री. चंद्रशेखर चोरे, उपायुक्त (आपत्कालीन व्यवस्थापन) श्री. प्रभात रहांगदले, संचालक (आपत्ती व्यवस्थापन) श्री. महेश नार्वेकर आणि संबंधित अधिकारी उपस्थित
होते.
जसंवि/ १५५
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा