पालकमंत्री आदित्य ठाकरे यांची मुंबई महापालिका मुख्यालयातील आपत्ती नियंत्रण कक्षास भेट - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

मंगळवार, १८ मे, २०२१

demo-image

पालकमंत्री आदित्य ठाकरे यांची मुंबई महापालिका मुख्यालयातील आपत्ती नियंत्रण कक्षास भेट

मुंबई : तोक्ते या चक्रीवादळामुळे बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात वेगवान वारे वाहत असून पाऊस देखील सुरू आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण, पर्यटन मंत्री व मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी आज दुपारी बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील आपत्ती नियंत्रण कक्षास भेट दिली.

पालकमंत्री श्री. ठाकरे यांनी मुंबईतील परिस्थितीचा व महानगरपालिकेद्वारे करण्यात येत असलेल्या कार्यवाहीचा आढावा घेतला. याप्रसंगी स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव, महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल आदी उपस्थित होते

Hon.+Minister+Aditya+Thackeray+Visits+BMC+Control+Room+2

Hon.+Minister+Aditya+Thackeray+Visits+BMC+Control+Room


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

पेज

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *