दादरच्या स्विमिंग पूल मध्ये मगरीचे पिल्लू - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

मंगळवार, ३ ऑक्टोबर, २०२३

demo-image

दादरच्या स्विमिंग पूल मध्ये मगरीचे पिल्लू

सुरक्षा व्यवस्थेतील ढिलाई पुन्हा एकदा समोर

मुंबई, दि. ३ : दादर पश्चिम छत्रपती शिवाजी महाराज मैदानाजवळील महात्मा गांधी जलतरण तलावात दोन फूट लांब मगर घुसल्याने एकच धावपळ उडाली होती. तलावाच्या कर्मचाऱ्यांनी ही मगर पकडून वन खात्याकडे सुपूर्द केली असली तरी या ठिकाणी पोहण्यासाठी येणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न यामुळे पुन्हा एकदा समोर आला आहे.

crocodile%20in%20dadar%20swimming%20pool

दादर मधील पालिकेच्या या जलतरण तलावत दररोज नोंदणीकृत सदस्य जलतरणासाठी येतात. या पार्श्वभूमीवर दररोज पहाटे तरण तलाव सुरू करण्यापूर्वी संबंधित कर्मचाऱ्यांद्वारे तरण तलावाचे काळजीपूर्वक निरीक्षण करण्यात येते. यानुसार मंगळवारी पहाटे ५.३० वाजता त्या तरण तलावाचे निरीक्षण करीत असताना ऑलम्पिक आकाराच्या व शर्यतीसाठीच्या तरण तलावात मगरीचे पिल्लू आढळून आले. त्यानंतर या ठिकाणच्या कर्मचाऱ्यांनी तज्ञांच्या मदतीने तत्काळ कारवाई करत हे पिल्लू सुरक्षितपणे बाहेर काढले. हे पिल्लू वनखात्याच्या ताब्यात देण्यात आल्याचे जलतरण तलाव व नाट्यगृहाचे समन्वयक संदीप वैशंपायन यांनी सांगितले. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

पेज

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *