अमेरिकन नागरिकांना बोगस कॉल सेंटरद्वारे फसवणाऱ्या टोळीला अटक - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

ब्रेकिंग

रविवार, २३ फेब्रुवारी, २०२५

अमेरिकन नागरिकांना बोगस कॉल सेंटरद्वारे फसवणाऱ्या टोळीला अटक

मुंबई : बोरिवली पश्चिमेला बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत अनधिकृत थाटलेले कॉल सेंटर मुंबई गुन्हे शाखेने उद्ध्वस्त केले. या कॉल सेंटरमधून मायक्रोसॉफ्टमधील तांत्रिक अडचण दूर करण्याच्या बहाण्याने अमेरिकन नागरिकांची फसवणूक केली जात होती. या कारवाईत चार जणांना अटक करून दोन लाख ४१ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.

बोरिवली पश्चिमेला अमरकांत झा मार्गावर अर्पण अपार्टमेंट नावाची बांधकाम सुरू असलेली इमारत असून त्या इमारतीत बोगस कॉल सेंटर थाटण्यात आले होते. कॉल सेंटरद्वारे अमेरिकन नागरिकांना त्यांच्या सॉफ्टवेअरमध्ये समस्या असल्याचे सांगण्यात आले. फसवणूक करणारे अमेरिकन नागरिकांना सांगत असत की ते मायक्रोसॉफ्टशी संबंधित आहेत आणि टोल-फ्री नंबरवर कॉल करून त्यांच्याकडून त्यांचे बँक तपशील घेतले जात होते. आणि बँकेतून सर्व पैसे काढले जात होते. 


फसवणूक करणारे परदेशी नागरिकांना सांगत असायचे की, ते एका कंपनीशी संबंधित आहेत आणि त्यांच्या लॅपटॉप किंवा डेस्कटॉपमध्ये, मायक्रोसॉफ्ट विंडोजमध्ये काही समस्या आहेत. त्या ऑनलाइन सोडवता येऊ शकतात आणि त्यासाठी काही रक्कम द्यावी लागेल. अशा प्रकारे, ते परदेशी नागरिकांचे बँक तपशील गोळा करायचे आणि नंतर सायबर फसवणूक करायचे. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, युनिट-१२ च्या पथकाने छापेमारी करून कॉल सेंटर चालविणारा, क्लोसर आणि दोन टीम लीडर अशा चौघांना ताब्यात घेतले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज