मुंबई, दि.२ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत रविवारी स्वच्छता ही सेवा हा एक तास श्रमदानाचा मुंबई स्वच्छ करण्याचा उपक्रम मोठ्या प्रमाणात राबवला गेला खरा. पण, त्यामुळे पक्षीय मतभेदांचे जळमोठे काही स्वच्छ झाली नाहीत. एकीकडे विरोधी पक्षांकडून त्याकडे सपशेल पाठ फिरवली गेली असतानाच महायुतीत सहभागी असलेल्या पक्षांनीही आपापले श्रमदान आपापल्या नेते कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत केले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्यपाल रमेश बैस यांच्या उपस्थितीत रविवारी गिरगाव चौपाटी स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. या मोहिमेत शाळा आणि जोगेश्वरीच्या मर्कल उल मरीफ एज्युकेशन अँड रिसर्च सेंटरचे विद्यार्थी सहभागी झाले होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा