कल्पतरू समूहाच्या रक्तदान शिबिरास भरघोस प्रतिसाद - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

ब्रेकिंग

रविवार, २ मार्च, २०२५

कल्पतरू समूहाच्या रक्तदान शिबिरास भरघोस प्रतिसाद

एका रक्ताच्या पिशवीमुळे तीन रुग्णांचे जीव वाचले जातात. म्हणजे कल्पतरू समूहाने आजपर्यंत तब्बल ५०,००० ते ६०,००० जणांचे जीव वाचवले आहेत- कांतीलाल पवार, नायर रुग्णालय-समाजविकास अधिकारी


मुंबई, दादासाहेब येंधे : चिंचपोकळी (पू) येथील कल्पतरू समूहातर्फे नुकत्याच पार पडलेल्या ३३ व्या रक्तदान शिबिरात १११ रक्तदात्यांनी रक्तदान करून भरघोस प्रातिसाद दिला. या कार्यक्रमास स्थानिक शिवसेना नगरसेवक श्री. रमाकांत रहाटे यांनी उपस्थिती लावून मंडळाची शिस्त व रक्तदान शिबिराचे सातत्य याविषयी तोंडभरून कौतुक केले. तसेच कल्पतरू समूह म्हणजे आपलं हक्काचं मंडळ असल्याचे गौरवोद्गार काढले.


वार्प इंजियनरिंग या कंपनीच्या रिबेका गोला यांनी ३३ वर्षे रक्तदान शिबिर राबवून सातत्य राखल्याबद्दल कल्पतरू समूहाला शुभेच्छा दिल्या. नायर रुग्णालयाचे रक्तपेढीचे समाजविकास अधिकारी कांतीलाल पवार यांनी  मंडळाला संबोधताना म्हटले की, कल्पतरू समूह हे मंडळ गेली ३३ वर्षे सतत रक्तदान शिबिर राबवून मोठी देशसेवा करत आहे. कारण, एका रक्ताच्या पिशवीमुळे तीन रुग्णांचे जीव वाचले जातात. म्हणजे मंडळाने आजपर्यंत तब्बल ५०,००० ते ६०,००० जणांचे जीव वाचवले आहेत असे म्हटल्यास वावगे ठरू नये. ही मोठी कौतुकाची बाब आहे. 



सदर रक्तदान शिबिरास  डॉक्टर कम्पाउंड मित्र मंडळ, चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळ, रुग्णमित्र साडविलकर तसेच विविध सामाजिक संस्था यांनी हजेरी लावली.



सदर रक्तदान शिबिर यशस्वी होण्यासाठी विठ्ठल पै, शेखर साळसकर, शिवाजी पाटील, सुजित, अविरात, महेश नानचे, स्वप्नील, शुभम स्वार, वैष्णवी, मल्हार, अमेय परब, श्री. बाळा परब, प्रमोद, विकास सक्रे, संजीव केरकर, चारुदत्त लाड, श्री. शिवणेकर, नंदू साळसकर, आदित्य देसाई,  संकल्प नलावडे, विनायक येंधे, मिलिंद चाळके,  स्वराज पाटील, अनुष्का चाळके, शिवराम पाटकर, अनंता विचारे, चारुदत्त लाड, समीर नाईक, नंदू मोरये, आनंदा पाटील आदी कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज