हरवलेले मोबाईल पोलिसांनी केले परत - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

रविवार, २४ सप्टेंबर, २०२३

demo-image

हरवलेले मोबाईल पोलिसांनी केले परत

मुंबई, दि. २४ : प्रवासादरम्यान मुंबईकरांच्या हरवलेले २१ मोबाईल पोलिसांनी शोधून काढत त्यांना परत केले आहेत. मानखुर्द पोलिसांनी ही कामगिरी केली आहे. हरवलेल्या मोबाईलच्या तक्रारी पोलीस ठाण्यात दाखल झाल्यानंतर तांत्रिक पुरावांच्या मदतीने या मोबाईलचा शोध सुरू ठेवला होता. सातत्याने याचा पाठपुरावा केल्यानंतर पोलिसांना २१ मोबाईल शोधून ते हस्तगत करण्यात यश आले. परिमंडळ-६ चे उपयुक्त हेमराजसिंह राजपूत यांच्याहस्ते २१ सप्टेंबरला हे २१ मोबाईल मूळ मालकांना परत करण्यात आले आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

पेज

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *