सायबर चोरांना मदत करणाऱ्या दोघांना अटक - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

रविवार, २ फेब्रुवारी, २०२५

demo-image

सायबर चोरांना मदत करणाऱ्या दोघांना अटक

चेन्नई, तामिळनाडू येथून अटक

मुंबई, दादासाहेब येंधे : सायन पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्यावर्षी २६ नोव्हेंबर रोजी एका अज्ञात व्यक्तीने लिंक पाठवून मोबाईल हॅक करून फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसांनी दोन सायबर चोरांना नुकतीच अटक केली आहे. कार्तिक विश्वनाथन व नंदकुमार कुमारन, अशी त्यांची नावे आहेत. हे दोघे बँकांमध्ये खाती उघडून ती विदेशातील सायबर चोरांना वापरण्यास देत असल्याचे उघड झाले. फसवणुकीतील पैसे वळते करण्यासाठी तीन बँक खात्यांचा वापर करण्यात आला असून, यामध्ये कोट्यवधी रुपये वळविण्यात आल्याचे समोर आले आहे.

%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A8%20%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%B8%20%E0%A4%A0%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%87%20IMG-20250131-WA0018

सायन येथील एका व्यक्तीच्या मोबाइलवर व्हॉटसअपवर लिंक पाठवून त्यांचा मोबाइल हॅक करून एक लाख रुपये परस्पर वळविण्यात आले होते. या प्रकरणी गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला असता तांत्रिक विश्लेषणात आरोपी चेन्नई येथील असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार सायबर सेलचे सहायक निरीक्षक दत्तात्रय खाडे यांच्यासह कुंभार, डबडे यांचे पथक तमिळनाडूला तपास करण्यासाठी गेले. या पथकाने चार आरोपींना ताब्यात घेऊन चौकशी केली असता दोघांचा गुन्ह्यात सहभाग आढळून आला. त्यावरून कार्तिक आणि नंदकुमार यांना अटक करण्यात आली आहे. हे दोघे बँकांमध्ये चालू खाते उघडून टेलीग्रामवरून विदेशी नागरिकांना कमिशनवर वापरण्यास  देत असल्याचे तपासात उघड झाले आहे. 


दोन्ही आरोपींना मुंबईत आणून त्यांची चौकशी केली असता त्यांनी तीन बँक खात्यांचा वापर फसवणूक करण्यासाठी केल्याचे निष्पन्न झाले आहे. या तीन खात्यांमध्ये कोट्यवधी रुपयांचे बँक व्यवहार झाले आहेत. या बँक खात्यांबाबत राजस्थान, कर्नाटक, तमिळनाडू, पश्चिम बंगाल, झारखंड, गुजरात, उत्तरप्रदेश, तेलंगणसह इतर राज्यांतून सुमारे १००हून अधिक ऑनलाइन तक्रारी सायबर काईम पोर्टलवर दाखल आहेत. पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Sion%20Police%20Station%20pressnote


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

पेज

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *