राजस्थान मधून आरोपींना केली अटक
०२ मे २०२३
मुंबई, दादासाहेब येंधे : झवेरी बाजारातील व्यापाऱ्याला दागिने देण्याच्या बहाण्याने त्यांची ४२ लाखांची रक्कम घेऊन पसार झालेल्या आरोपीला लोकमान्य टिळक पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. राजस्थानमध्ये दोन दिवस पाळत ठेवून पोलिसांनी ही उत्तम कामगिरी बजावली आहे. हुकूमसिंह राजपूत आणि छत्तरसिंग राजपूत असे या आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून ३५ लाख रुपये रोख आणि गुन्ह्यात वापरलेली कार जप्त केली आहे.

तक्रारदार यांचा झवेरी बाजारात सोन्याचे दागिने खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे. १९ मे रोजी त्याचे हैदराबाद मध्ये झालेल्या ज्वेलरी प्रदर्शनात हुकूमसिंह सोबत भेट झाली. त्याने तो सोने व्यापारी असल्याचे सांगून त्याच्याकडे असलेल्या विविध प्रकारच्या सोन्याच्या डिझाईन दाखवून खरेदी बाबत विचारले. दागिने आवडल्याने त्यांनी ५० लाखांची ऑर्डरही दिली.:हुकुमशह याने २२ मे रोजी सोने व्यापाऱ्याला फोन करून दागिन्यांची ऑर्डर तयार झाल्याचे सांगितले. त्यानंतर हुकूम सिंगने त्यांचा विश्वास संपादन करत सुरुवातीला काही रक्कम दिली तरच ऑर्डर पाठविणे शक्य असल्याचे सांगितले. त्यानुसार त्यांनी त्याच्या माणसाकडे ४२ लाख रुपये पाठविले. आरोपीने त्याचा साथीदार छत्तरसिंह याला आयुष्यमान नाव सांगून व्यापाऱ्याच्या दुकानात पाठवले होते. तासाभरात दागिने आणून देणार असल्याचे सांगून दोघांनीही तेथून पलायन केले होते.
फसवणूक झाल्याची खात्री पटतच त्याने पोलिसांना धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार फसवणुकीचा गुन्हा नोंदविला. पायधुनी विभागाच्या सहाय्यक पोलीस आयुक्त ज्योत्स्ना रासम आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्योती देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशील कुमार वंजारी यांच्या पथकाने तपास सुरू केला. व्यापाऱ्याने दोन हजाराच्या नोटा दिल्याने त्या भारतीय चलनातून बंद होणार असल्याने व्यापारी तक्रार देणार नाही असा समज करत त्यांनी रकमेचा अपहार केल्याचे पोलिसांना सांगितले.
असा झाला अटकेचा थरार -
सीसीटीव्हीच्या मदतीने आरोपींचा शोध सुरू केला असता ते मीरा रोड परिसरातून राजस्थान येथे गेल्याचे दिसून आले. पोलीस पथक तात्काळ राजस्थानला रवाना झाले. राजस्थानमध्ये कुकावास या गावात असल्याचे पोलिसांना समजले. मात्र, कुकावास या गावांमध्ये यापूर्वी पोलीस पथकावर अनेक वेळा हल्ले झाले असल्याने पथकाने गावाबाहेरच दोन दिवस पाळत ठेवून आरोपींना अटक केली.
Press note
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा