Ticker

6/recent/ticker-posts

गुड फ्रायडे निमित्त निघाल्या भव्य मिरवणुका

मुंबई, दि. ८ : धारावीत गुड फ्रायडे निमित्त सेंट अंतोनी चर्चच्यावतीने मदर मेरी आणि येशू ख्रिस्तांच्या मूर्तीसह भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. येशू ख्रिस्तांचा बलिदानाचा दिवस असल्याने भावपूर्ण वातावरणात ख्रिस्ती बांधव यात सहभागी झाले होते.



महिला भाविकांनी मदर मेरीची तर पुरुषांनी येशू ख्रिस्ताची मूर्ती खांद्यावर उचलून धरली होती. ख्रिस्ताने वधस्तंभावर चढण्याआधी उच्चारलेले सात शब्द शेकडो भाविक उच्चारत होते.  धारावीतील मुख्य रस्त्यावरून भव्य मिरवणूक काढण्यात आली होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या