१२ तासांत पोलिसांनी गुन्हेगाराला केली अटक
मुंबई, (दादासाहेब येंधे) : मुंबईत एका व्यक्तीने आपल्या चार वर्षांच्या सावत्र मुलीची गळा दाबून हत्या केली आणि तिचा मृतदेह अरबी समुद्रात फेकून दिल्याचा प्रकार समोर आला आहे. कुलाबा पोलिसांनी या प्रकरणाची माहिती दिली.

पोलिसांनी सांगितले की, आरोपी इम्रान शेखला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी कुलाबा पोलिस अधिकाऱ्यांना दक्षिण मुंबईतील ससून डॉकजवळ समुद्रात मुलीचा मृतदेह तरंगताना आढळला. येथील एका अधिकाऱ्याने सांगितले की, ही मुलगी मध्य मुंबईतील अँटॉप हिल भागातून बेपत्ता झाली होती.
तिचे सावत्र वडील शेख आणि आई नाजिया यांनी अँटॉप हिल पोलिस ठाण्यात मुलीच्या बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. नाजिया घरकाम करते. तक्रारीच्या आधारे, अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तपासादरम्यान, पोलिसांनी अँटॉप हिल आणि आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि मुलगी तिच्या सावत्र वडिलांसोबत आढळली. त्यांनी शेखच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली आणि गुन्ह्यात त्याचा सहभाग असल्याचा संशय बळावला. अमायरा असे मृत मुलीचे नाव असून ती आई नाझियासोबत अॅटॉप हिलच्या राजीव गांधीनगरातील बंगालीपुरा येथे राहण्यास होती. दोन वेळा लग्न मोडल्यानंतर नाझियाने नुकतेच इम्रान ऊर्फ इम्मू या तरुणाशी लग्न केले होते.
मुलीचा मृतदेह समुद्रात सापडल्यानंतर पोलिसांनी शेखला ताब्यात घेतले आणि त्याची चौकशी सुरू केली. चौकशीदरम्यान त्याने आपल्या सावत्र मुलीची हत्या करून तिचा मृतदेह समुद्रात फेकल्याची कबुली दिली, असे अधिकाऱ्याने सांगितले. पती-पत्नीतील वादातून ही हत्या झाल्याचा पोलिसांना संशय आहे. शेखचे मुलीच्या आईशी दुसरे लग्न झाले होते. आरोपी इमरान, त्याची पत्नी आणि ४ वर्षांच्या मुलीसोबत रहात होता. मात्र, ती चिमुरडी मुलगी रोज रात्री उशिरापर्यंत मोबाईलवर खेळत असायची. त्यामुळे इमरानला त्याच्या पत्नीसोबत वेळ घालवता यायचा नाही, याचाच त्याच्या मनात राग होता. आणि त्याच रागातून हे भयानक हत्याकांड घडलं.
सदरची उत्कृष्ट कामगिरी मा. पोलीस आयुक्त, श्री. देवेन भारती, मा. पोलीस सह आयुक्त श्री. सत्यनारायण चौधरी (कायदा व सुव्यवस्था), अप्पर पोलीस आयुक्त श्री. विकम देशमाने (मध्य प्रादेशिक विभाग), पोलीस उप आयुक्त श्रीमती रागसुधा आर, (परिमंडळ ४), सहा. पोलीस आयुक्त श्री. शैलेंद्र धिवार (सायन विभाग), यांच्या मार्गदर्शनाखाली व.पो.नि. केशवकुमार कसार, पो. नि. गोपाळ भोसले, पो.नि. किशोरकुमार राजपूत, म.पो.नि. अर्चना पाटील, स.पो.नि. शिवाजी मदने, स.पो.नि. प्रदिप पाटील, स.पो.नि.आण्णासाहेब कदम, स.पो.नि. कांबळे, स.पो.नि. निगुडकर, पो.उप.नि. विनोद पाटील, पो.उप.नि. सिध्दकी, पो.उप.नि. राहूल वाघ, पो.उप.नि. केदार उमाटे, पो.उप.नि.गौरव शिंदे, म.पो.उप.नि. सरोजिनी इंगळे, म.पो.उप.नि.पूजा शिर्के, पो.ह.क्र.०७०९०६/टेळे, पो.ह.क्र.०७०४९१/गस्ते,पो.ह.क्र.९७०५६९/सानप, पो.ह.क्र.०७०६७४/ठोके, पो.ह.क्र.९८०९६९/सिंग, पो. ह.क्र.०७०७२३/तांबे, पो.शि.क्र.११०७९५/आमदे, पो.शि. क्र.१५०४५८/किरतकर, पो.शि.क्र.१५१४४६/सजगणे, पो.शि.क्र.०९२५१६/पाटील, पो.शि.क्र.१११११८/माने, पो.शि.क्र.१५०२३१/माने, पो.शि. क्र.१४२४३१/खोत, पो.शि.क्र.१३०१८७/बार्शी, पो.शि.क्र.१३०६१८/चव्हान, पो.शि.क.१४१५०१/सनगर, पो. शि.क्र.१४१८५६/भोसले, पो.शि.क्र. १५०४५६/घाडगे, १४२४९४/मांढरे यांनी पार पाडली आहे.
0 टिप्पण्या