वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी स्वतः हाताळली परिस्थिती
मुंबई, दादासाहेब येंधे : गणेशोत्सव अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपला आहे. अनेक मंडळांनी आपल्या मंडळांच्या गणेश मूर्ती मंडपात नेण्यास सुरुवात केली आहे. अशातच चिंचपोकळीचा चिंतामणी म्हणून प्रसिद्ध असलेल्या गणरायाचा आगमन सोहळा काल पार पडला आहे. दोन वर्षांनंतर उत्सवव साजरा करण्याची परवानगी मिळाल्यानंतर सर्वांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत होते. त्यामुळे चिंतामणी सार्वजनिक उत्सव मंडळाच्या गणपतीच्या आगमनाच्यावेळी मोठी गर्दी पाहायला मिळाली. प्रसंगी चिंचपोकळी व्यतिरिक्त कल्याण, ठाणे, विरार, कुर्ला, सायन, घाटकोपर, पूर्व उपनगरे आदी ठिकाणांहून तरुणवर्ग मोठया प्रमाणावर ट्रेनने आल्यामुळे चिंचपोकळी स्थानकावर अलोट गर्दी जमली होती.
दुपारपासूनच ट्रेन खचाखच भरून येत होत्या. सदर स्थानकावर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून दादर लोमार्ग पोलीस ठाणेच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्मिता ढाकणे तसेच त्यांचे सहकारी यांनी चिंचपोकळी स्थानकावर येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांमध्ये धक्काबुक्की सारखे प्रकार घडू नये व गर्दी दोन्ही बाजूला विभागली जावी म्हणून स्थानकावर मोठी भली मोठी दोरी बांधून प्रवाशांना विभागले होते.
व्हिडिओ पहा...👇
तसेच प्रवाशी भक्तांना हेड कॉन्स्टेबल गोरखनाथ मोहिते हे मेगाफोनद्वारे योग्य ती माहिती देत होते. आरपीएफ जवानांची देखील त्यांना मदत लाभली. दादर लोहमार्ग पोलिसांनी केलेल्या योग्य नियोजनामुळेच चिंचपोकळी स्थानकावर कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा