Ticker

6/recent/ticker-posts

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून सरन्यायाधीश उदय लळीत यांचे अभिनंदन

मुंबई, दि. २९ : भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी विराजमान झाल्याबद्दल न्यायमुर्ती उदय लळीत यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिनंदन केले असून त्यांना पुढील वाटचालीस आदरपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.

 


न्यायमुर्ती लळीत यांना शनिवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सरन्यायाधीश पदाची शपथ दिली.

   

"महाराष्ट्र सुपुत्र न्या.लळीत यांची कारकीर्द भारतीय न्यायव्यवस्थेवरील विश्वास आणि तिचा गौरव वृद्धींगत करणारी ठरेल," असेही मुख्यमंत्र्यांनी शुभेच्छा संदेशात म्हटले आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या