छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस लोहमार्ग पोलीस ठाणे यांची उत्कृष्ट कामगिरी
मुंबई,दि.२६ : लोकल प्रवासादरम्यान महिलांचा विनयभंग करणाऱ्या दोघांना छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे पोलिसांनी नुकतीच अटक केली. सलमान सय्यद व गोपी बोये अशी त्यांची नावे आहेत.
अल्पवयीन मुलगी ही तिच्या मैत्रिणीसोबत दादर येथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला येत होती. लोकल भायखळा येथे थांबल्यावर सलमान हा डब्यात चढला. तो त्या दोन मुलींकडे पाहून अश्लील इशारे करत होता. लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे आल्यावर त्या दोघी खाली उतरल्या. मुलींनी आरडाओरड केल्यावर गस्तीवर असलेल्या पोलिसांनी त्यांची विचारपूस केली. तेव्हा संपूर्ण प्रकार समोर आला. त्यानंतर पोलिसांनी सलमानला ताब्यात घेतले. त्याच्याविरोधात पॉक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करून अटक केली अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मेहबूब इनामदार यांनी दिली.
दुसरी घटना - तक्रारदार महिला ही रक्षाबंधनच्या खरेदीसाठी भावासोबत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे आली असताना तेथून खरेदी केल्यानंतर ते दोघे ट्रेन पकडून बदलापूरच्या दिशेने जात होते. तक्रारदार महिला ही महिलांच्या डब्यात तर तिचा भाऊ हा पुरुषांच्या डब्यात बसले होते. लोकल सुरू झाल्यावर गोपी हा त्या डब्यात शिरला. त्याने सदर महिलेस अश्लील इशारे केले. तिने याची माहिती आपल्या भावाला दिली. लोकल मस्जिद बंदर स्थानक येथे थांबल्यावर महिलेच्या भावाने पोलिसांच्या मदतीने गोपी यास ताब्यात घेतले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा