अंधेरीच्या एमआयडीसी मधील घटना
मुंबई, दि. २६ : अंधेरी येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये जेवणाच्या ऑर्डर वरून झालेल्या वादातून कुकने वेटरची हत्या केल्याची घटना घडली. जगदीश जलाल असे मृताचे नाव असून हत्येप्रकरणी माधव मंडल यास एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे.
हिमाचलचा रहिवासी असलेल्या जगदीश हा अंधेरीच्या एमआयडीसी येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये वेटरचे काम करायचा. तर बिहारचा रहिवासी असलेला माधव हा त्या हॉटेलमध्ये गेल्या वर्षभरापासून कुकचे काम करतो. गुरुवारी रात्री (२१ जुलै २०२२) जेवणाच्या ऑर्डरवरून जगदीश आणि माधवचा वाद झाला होता. तेव्हा हॉटेलचा मॅनेजरने तो वाद मिटवला होता. पण, दुसऱ्या दिवशी होता त्या दोघांची समजूत काढण्यात आली होती. पण दुसऱ्या दिवशी सकाळी जगदीश आणि माधव नेहमीप्रमाणे ड्युटीला आले.
साडेआठच्या सुमारास जगदीश किचनमध्ये गेला. तेव्हा माधव किचनमध्ये भाजी कापत होता. त्यादरम्यान त्यांच्यात पुन्हा वाद झाला. रागाच्या भरात माधवने भाजी कापण्याच्या चाकूने जगदीशच्या छातीवर आणि पाठीवर वार केला. हा प्रकार इतर कर्मचाऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी जगदीशला रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेची माहिती समजताच एमआयडीसी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी गुन्हा नोंद करून माधव मंडलला अटक केली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा