केक कापून महिला दिन साजरा
मुंबई, दादासाहेब येंधे : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस लोहमार्ग पोलीस ठाणे येथे काल जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने महिला दक्षता समितीची बैठक वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. उपस्थित महिला सदस्यांना महिला दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या तसेच महिला रेल्वे प्रवाशांच्या समस्येबाबत चर्चा करण्यात आली.
महिला पोलीस अधिकारी व अंमलदार तसेच महिला दक्षता समिती सदस्या या सर्वांनी एकत्र येऊन केक कापून महिला दिन साजरा केला. महिला पोलिसांनी स्थानकातून प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांना गुलाब पुष्प देऊन त्यांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या अशी माहिती छत्रपती शिवाजी महाराज लोहमार्ग पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक एम. ए. इनामदार यांनी दिली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा