मुंबई : मुंबई पोलीस दलातील उल्लेखनीय व गुणवत्तापूर्ण सेवा देणाऱ्या राज्यातील ९७ पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याहस्ते २०२० वर्षासाठी जाहीर झालेली राष्ट्रपती पोलीस पदके व गुणवत्तापूर्ण सेवा पदके सोमवारी राजभवनामध्ये प्रदान करण्यात आली. त्याप्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) आनंद लिमये, पोलीस महासंचालक रजनीश शेठ, मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे हे उत्सवमूर्ती पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांसह उपस्थित होते.
पोलीस
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा