नायजेरियन ड्रग्स माफियासह दोघांना अटक
८ लाख २० हजारांचा मुद्देमाल जप्त
मुंबई : उपनगरातील नशेबाजांना एमडी ड्रग्सचा साठा विकण्यासाठी आलेल्या एका नायजेरियन महिला ड्रग्ज माफियासह स्थानिक पेडलरला अमली पदार्थविरोधी पथकाने रंगेहात पकडले. बाबीरे ग्रेस (२८), असे नायजेरियन तर अफझल सय्यद (४९) असे स्थानिक ड्रग्सअफियांची नावे आहेत. त्या दोघांकडून ८ लाख २० हजार किमतीचा ८२ ग्रॅम एमडी हस्तगत केला.
नायजेरियन महिला ड्रग्स माफिया गोरेगावच्या दूधसागर बस स्टॉप जवळ एमडी विकायला येणार असल्याची खबर घाटकोपर युनिटला मिळाली होती. त्यानुसार प्रभारी निरीक्षक लता सुतार यांच्या पथकाने त्या ठिकाणी सापळा रचला. मिळालेल्या माहितीनुसार नायजेरियन महिला व स्थानिक पेडलर तेथे येताच पोलिसांनी त्यांच्यावर झडप घातली. दोघांच्या अंगझडतीत ८२ ग्रॅम एमडीचा साठा सापडला. हे दोघे मुंबई व उपनगरात ड्रग्सचा पुरवठा करतात. दोघांचे आणखी कोण साथीदार आहेत याचा पोलीस शोध घेत असल्याचे उपायुक्त दत्ता नलावडे यांनी सांगितले.
घाटकोपर युनिटने आठवडाभराच्या कालावधीत वेगवेगळ्या ठिकाणी जोरदार कारवाई केल्या आहेत. तब्बल २२ लाख किंमतीचा एमडी ८ लाख किमतीचा गांजा आणि ७० हजार किमतीचे कोडेन मिश्रित सिरपच्या बाटल्या असा साठा जप्त करून ड्रग्ज माफियांना गजाआड केले. त्यात नायजेरियन ड्रग्स माफियाचादेखील समावेश आहे.
Press Note
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा