Ticker

6/recent/ticker-posts

‘व्हर्चुअली वाईल्ड’ या आभासी सफर मालिकेतील चौथ्या भागाचे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त श्रीमती आश्विनी भिडे यांच्या हस्ते अनावरण

जागतिक चिमणी दिवस (२० मार्च) व जागतिक वन दिन (२१ मार्च) या दोहोंचे औचित्य साधून वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालयाच्या 'व्हर्चुअली वाईल्ड' या आभासी सफर मालिकेतील चौथ्या भागाचे अनावरण (दिनांक २१ मार्च २०२२) अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) श्रीमती आश्विनी भिडे यांच्या हस्ते करण्यात आले. 


या कार्यक्रमासाठी उपायुक्त (मध्यवर्ती खरेदी खाते) श्री. रमाकांत बिरादार, उद्यान अधीक्षक श्री. जितेंद्र परदेशी, प्राणिसंग्रहालयाचे संचालक श्री. संजय त्रिपाठी, उपअधीक्षक (पशुवैद्यकीय) डॉ. कोमल राऊळ तसेच प्राणिसंग्रहालयाचे अधिकारी, कर्मचारी, कामगार उपस्थित होते. ह्या आभासी मालिकेचे सर्व भाग ‘द मुंबई झू’ ह्या यूट्यूब चॅनेलवर पाहता येतील.

त्याचप्रमाणे, उद्यान व प्राणिसंग्रहालय परिसरामध्ये जमा होणाऱया पालापाचोळ्यापासून गांडूळ खत निर्मिती केली जाते. वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालयाच्या शतकोत्तर अमृत महोत्सवाच्या निमित्ताने, हे खत आता नागरिकांना खरेदी करता येण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. तर, बागेत बसण्यासाठी नवीन बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. या दोन्ही सुविधांचे लोकार्पण देखील अतिरिक्त आयुक्त श्रीमती आश्विनी भिडे यांच्या हस्ते करण्यात आले.


दिनांक १९ नोव्हेंबर १८६२ रोजी वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालय हे नागरिकांसाठी खुले करण्यात आले होते. दिनांक १८ नोव्हेंबर २०२२ रोजी या ऐतिहासिक घटनेला तसेच वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयाला १६० वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयाचा शतकोत्तर हीरक महोत्सव वर्षभर वेगवेगळ्या कार्यक्रमातून साजरा करण्याचे योजिले आहे.













(जसंवि/६३१)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या