मुंबईत बत्ती गुल - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

सोमवार, २८ फेब्रुवारी, २०२२

demo-image

मुंबईत बत्ती गुल

मुंबई : मुंबईला वीज पुरवठा करणाऱ्या मुलुंड-ट्रॉम्बे या २२० किलोवॅट वीज वहिनीत तांत्रिक बिघाड झाल्याने रविवारी सकाळी दहा वाजल्यापासून जवळपास दोन तास मुंबईच्या विविध भागांतील वीज पुरवठा ठप्प झाला होता. देशाच्या आर्थिक राजधानीत तब्बल दोन तास वीजपुरवठा खंडित झाल्याने गोंधळ उडाला होता. 

महापारेषण, अदानी, टाटा, यांचा वीजपुरवठा परस्परांशी जोडलेला असल्याने महापरेषणच्या या बिघाडाचा शहर आणि उपनगरांतील बेस्ट, टाटा आणि अदानी या वीज कंपन्यांच्या ग्राहकांना मोठा फटका बसला. त्यात टाटा आणि बेस्टच्या वीज ग्राहकांचे प्रमाण मोठे होते. 

वीज पुरवठा बंद झाल्याने मोठा फटका बसला, तो लोकल आणि लांब पल्ल्यांच्या गाड्यांना. बराच वेळ प्रवाशांना काय झाले आहे हे समजले नव्हते. लांब पल्ल्यांच्या गाड्या यामुळे खोळंबल्या होत्या. रुग्णालयांतील जनरेटर बंद पडले होते. बिल्डिंमधील लिफ्टही बंद पडल्या होत्या. 

मुंबई शहरात सायन, कुलाबा, भायखळा, लालबाग, काळाचौकी, परळ, अँटॉप हिल, दादर, माहीम, फोर्ट यांसारख्या परिसरात बत्ती गुल झाली होती. टप्याटप्याने बहुतांश भागांत वीजपुरवठा सुरळीत होण्यास दोन तासांचा काळ लागला.









कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

पेज

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *