सायबर गुन्हेगारांकडून एनी डेस्क, बनावट लिंकचा सापळा - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

गुरुवार, ६ जानेवारी, २०२२

demo-image

सायबर गुन्हेगारांकडून एनी डेस्क, बनावट लिंकचा सापळा

मुंबई, दादासाहेब येंधे : गुगल सर्चचा होणारा सर्रास वापर सायबर गुन्हेगारांच्या पथ्यावर पडला आहे. अज्ञात इसमाने एनी डेस्क ॲप डाऊनलोड करण्यास किंवा एखादी लिंक पाठवून माहिती भरण्यास सांगितले तर सावधान...! आर्थिक फसवणूक करण्यासाठी सायबर भामट्यांकडून लावण्यात येणारा हा सापळा आहे. दररोज अनेकजण या सापळ्यात अडकून आपले लाखो रुपये गमावत आहेत.

कोणतीही माहिती मिळविण्यासाठी गुगल सर्चचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. हिच बाब हेरत सायबर गुन्हेगार गुगलवरच बोगस वेबसाइट अपलोड करत आहेत. नकळत त्या साइटवर जाऊन माहिती मिळविण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना सायबर गुन्हेगार आपले लक्ष्य बनवत आहेत.

.com/img/a/


 
एखाद्या कंपनीची किंवा आवश्यक बाबी साठी माहिती मिळवण्याच्या प्रयत्नात असलेल्यांना हे आरोपी संपर्क साधतात. आपण संबंधित कंपनी आणि कार्यालयातून बोलत असल्याचे भासवून समोरच्या व्यक्तीला वेगवेगळी विलोभने दाखवतात. मग शिताफीने लिंक पाठवून ॲप डाऊनलोड करण्यास सांगतात. येथेच सापळ्यात अडकवले जाते.

त्या एनी डेस्क ॲपच्या माध्यमातून भामटे नागरिकांची इत्यंभूत माहिती मिळवितात. त्यानंतर चलाखीने सायबर गुन्हेगार नागरिकांच्या बँक खात्यातील पैसे वळते करून घेत असल्याचे गुन्हे मोठ्या प्रमाणात घडू लागले आहेत. सध्या एनी डेस्क ॲपच्या माध्यमातून आर्थिक फसवणूक होण्याचे प्रमाण वाढले आहे. गंभीर म्हणजे सुशिक्षित व चांगल्या पदावर कार्यरत असलेले नागरिकच सायबर गुन्हेगारांच्या सापळ्यात सहज अडकत आहेत.

लिंकवर क्लिक करू नका!
आपण एखाद्या कंपनी तसेच एजन्सीचा शोध घेत असताना किंवा आपली केवायसी अपडेट करण्यासाठी अचानक अज्ञात व्यक्तीचा फोन आला आणि तो संबंधित ठिकाणाहून बोलतोय असे सांगू लागला की सावध राहा... ती व्यक्ती बोलण्यात गुंतवून एखादी लिंक पाठवून त्यावर माहिती भरण्यास सांगेल. मात्र, अशा लिंकवर क्लिक करु नका, असे आवाहन मुंबई पोलिसांतर्फे करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

पेज

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *