८९ लाखांचा दंड वसूल
मुंबई, (दादासाहेब येंधे) : नवीन वर्षाचं स्वागत करताना नियम धाब्यावर बसवणाऱ्यांना वाहन चालकांवर पोलिसांनी दंडात्मक कारवाई केलीय. नववर्षाचं स्वागत करताना बेशिस्त वाहन चालणाऱ्यांविरोधात मुंबईत पोलिसांनी कारवाई करत लाखो रुपयांचा दंड वसूल केला आहे.
पोलिसांनी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १७, ८०० वाहन चालकांकडून ८९ लाख १९ हजारांचा दंड वसूल केलाय. ३१ डिसेंबरच्या रात्री अपघात टाळण्यासाठी मुंबई वाहतूक पोलिसांमार्फत विशेष मोहीम राबविण्यात आली होती.
वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली. मुंबई पोलिसांनी बेशिस्तपणे वाहन चालवणाऱ्यांवर कारवाई करत ८९ लाख रुपयांचा दंड वसूल केलाय. पोलिसांनी १७,८०० बेशिस्त वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आलीय. तसेच ३१ डिसेंबरच्या रात्री मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवणाऱ्या १५३ तळीरामांवर देखील पोलिसांनी कारवाई केली आहे.
गेट वे ऑफ इंडिया परिसरातही नववर्षाच्या स्वागताचा उत्साह होता. शहरातील ठिकठिकाणची हॉटेल्स, रेस्तराँ, पब यांनी खास पार्ट्यांचे आयोजन केले होते. शहरात होणारी गर्दी लक्षात घेऊन कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा