मुंबई : अनाथांची माय अशी ओळख असलेल्या ज्येष्ठ समाजसेविका पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांचे मंगळवारी वयाच्या ७४ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने खाजगी रुग्णालयात पुणे येथे निधन झाले.
प्रकृती अस्वास्थ्यामुळे सपकाळ यांना महिनाभरापूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सपकाळ यांच्या निधनाने अनाथ मुले पुन्हा पोरके झाल्याची भावना व्यक्त होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा