प्रार्थनास्थळे ७ ऑक्टोबर पासून खुली
मुंबई : नवरात्रीच्या पहिल्या दिवशीपासूनच म्हणजे ७ ऑक्टोबर पासून राज्यातील सर्व धर्मियांची प्रार्थनास्थळे आरोग्याचे नियम पाळून भक्तांसाठी खुले करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे.
दुसऱ्या लाटेचा मुकाबला केल्यानंतर आता संभाव्य तिसऱ्या लाटेशी लढण्याचे आपण नियोजन केले आहे. धार्मिक स्थळे भक्तांसाठी खुली केली असली, तरी त्या ठिकाणी आरोग्याच्या नियमांचे पालन झालेच पाहिजे. चेहऱ्यावर मास्क, सुरक्षित अंतर, जंतुनाशकाचा वापर व्हावा. धार्मिक स्थळांच्या व्यवस्थापन समितीची ही जबाबदारी आहे असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा