मराठी ग्रंथालयाची निवडणूक पार - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

ब्रेकिंग

सोमवार, २७ सप्टेंबर, २०२१

मराठी ग्रंथालयाची निवडणूक पार

मुंबई : मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाचे पंचवार्षिक निवडणूक (२०२१-२०२६) काल रविवारी कोरोनाचे सर्व निर्बंध पाळून घेण्यात आली. ही निवडणूक सर्वच ठिकाणी अतिशय चुरशीची आणि अटीतटीची झाली. 


सर्व निवडणूक प्रक्रिया शांततेत आणि सुरळीतपणे पार पडली. या निवडणुकीचा निकाल ८ ऑक्टोबर २०२१ रोजी लागणार असल्याची माहिती निवडणूक अधिकारी किरण सोनवणे यांनी दिली आहे. निवडणुकीत एकूण २५ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावल्याची माहिती निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली. मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या निवडणुकीत नायगाव शाखेत ७, बोरिवली शाखेत ५, श्रीकृष्ण नगर शाखेत २, गोरेगाव मध्ये २ आणि मध्यवर्ती शाखेत २ अशा एकूण १८ जागांसाठी ही निवडणूक झाली. 


यात सुप्रिया सुळे, अनिल देसाई, आमदार कालिदास कोळंबकर, माजी आमदार विद्याताई चव्हाण, माजी खासदार भालचंद्र मुणगेकर, ज्येष्ठ पत्रकार प्रताप आसबे, नगरसेवक पड्याळ आदी मान्यवरांनी मतदान केले.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज