बसमध्ये बसलेल्या अंगडीयाचे ४६ लाखांचे दागिने लंपास - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

ब्रेकिंग

शनिवार, १४ ऑगस्ट, २०२१

बसमध्ये बसलेल्या अंगडीयाचे ४६ लाखांचे दागिने लंपास

सात जणांच्या टोळीला अटक

मुंबई, दादासाहेब येंधे : बसमध्ये बसलेल्या अंगडीयाच्या मांडीवर ठेवलेले ४६ लाख ५० हजारांचे दागिने घेऊन एक टोळी पसार झाली होती. मात्र, अंधेरी पोलिसांकडे याबाबत गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांनी सात जणांच्या टोळीला गुरुवारी अटक केली आहे.

महेंद्र मोरे, मनोश मेढे, आमीन शेख, शशिकांत कोलवालकर, विजयकुमार गुप्ता, मनीष दर्जी आणि शैतानसिंह राजपूत अशी अटक केलेल्या टोळीतील सात जणांची माहिती असून पुढील तपास सुरू आहे.

१८ जुलै २०२१ रोजी मधुकर कावीनकर यांनी अंधेरी पोलीस ठाणेत जाऊन तक्रार दाखल केली की, ते स्वतः दहिसरवरून झवेरी बाजार येथे ४६ लाख ५० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने घेऊन व्यापाऱ्यांला द्यायला जात असताना टोळीचा मुख्य सूत्रधार शेख याने कावीनकर यांच्या सीटजवळ घोळक्याने उभे राहत दागिन्यांची बॅग हिसकावून तेथून पळ काढला. तसेच स्वतःच साथीदारांसह चोर चोर म्हणत पाठलाग करू लागला.

तक्रारदार कावीनकर यांची दिशाभूल करत भलत्याच दिशेला चोर पळाल्याचे सांगत त्यांना रिक्षात बसून दिले. याप्रकरणी परिमंडळ १० चे पोलीस उपायुक्त महेश्वर रेड्डी तसेच अंधेरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय बेळगे यांच्या मार्गदर्शनाखाली या टोळीला अटक करण्यात आली. आणखी या टोळीत कितीजण सामील आहेत याचा तपास सुरु आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज