सीएसएमटी लोकल स्थानकात तपासणी - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

शनिवार, १४ ऑगस्ट, २०२१

demo-image

सीएसएमटी लोकल स्थानकात तपासणी

सीएसएमटी लोकल स्थानकात व्हिजिबल पोलिसिंग

मुंबई, दादासाहेब येंधे : स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर सतर्कतेच्या दृष्टीने सीएसएमटी रेल्वे स्थानक येथील लोकल लाईन तसेच मेन लाईन टर्मिनस येथील संपूर्ण परिसरात व्हिजिबल पोलिसिंग आणि विशेष घातपातविरोधी तपासणी सीएसएमटी लोहमार्ग वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण भगत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यात स्टेशन परिसर, स्टेशन प्रवेशद्वार, फलाट, स्थानकाच्या अडगळीच्या जागा, तिकीट बुकिंग हॉल, कचराकुंड्या, पार्किंग परिसर आदी तपासण्यात आले. यात कोठेही काहीही संशयास्पद आढळून आले नाही.

या तपासणी मोहिमेअंतर्गत पोलीस निरीक्षक भगवान डांगे, सहायक पोलिस उपनिरीक्षक मंगेश साळवी आणि पोलीस अंमलदार तसेच मुख्यालय घाटकोपर येथील आरपीआय विष्णू पारकर तसेच क्यूआरटीचे पोलीस अंमलदार सीएसएमटी मेन लाइनचे प्रभारी निरीक्षक कासार, लोकल लाइनचे प्रभारी निरिक्षक बी. डी. इप्पर, उपनिरीक्षक मोहम्मद युनूस खान आणि टी. आर. मीना कर्मचारी तसेच आरपीएफ डॉग-डॅनी, हँडलर बजरंग नागरगोजे यांचा समावेश होता. अशी माहिती सीएसएमटीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण भगत साहेब यांनी दिली आहे.

001

002

003

004

006

007




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

पेज

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *