मुंबई, दादासाहेब येंधे : मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे सुरक्षा तसेच गुन्हे प्रतिबंधाच्या दृष्टीने विशेष तपासणी अभियान सोमवारी (ता. २६) राबवण्यात आले. लोहमार्ग पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक प्रवीण भगत यांच्या मार्गदर्शनाखाली फलाट, अडगळीच्या जागा, कचराकुंड्या, स्थानक परिसर, बुकिंग हॉल, स्वच्छतागृह तसेच येणाऱ्या-जाणाऱ्या प्रवाशांमधील संशयित प्रवासी आणि त्यांच्या सामानाची तपासणी करण्यात आली.
प्रसंगी पोलीस उपनिरीक्षक ज्योती मदकट्टे, दहा पोलीस अंमलदार, श्वानपथक, तांत्रिक शाखेचे निलेश भांडलवलकर, सहायक पोलिस उपनिरीक्षक मंगेश साळवी आदी सहभागी झाले होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा