मोबाईल चोरांना अटक
निर्मल नगर पोलिसांची धडक कारवाई
मुंबई, दादासाहेब येंधे : शनिवार २४ जुलै २०२१ रोजी अमित पुरुषोत्तम करंदीकर, वय ४५, हे बांद्रा कोर्ट येथून बांद्रा स्थानकाकडे पायी चालत जात असताना एच डी आय यल टॉवर समोर, अ. के. मार्ग, बांद्रा मुंबई. येथे कोणीतरी अनोळखी व्यक्तीने त्यांच्या नकळत पाठीवरील बॅगची चैन उघडून अमित यांचा सोनी कंपनीचा मोबाईल संमतीशिवाय चोरून नेला म्हणून गुन्हा दाखल केला होता.
त्याअनुषंगाने तपास करीत असताना आरोपी १) निखिल विजय उर्फ संजय तांबे वय २८ राहणार अंधेरी पाईपलाईन, अंधेरी, मुंबई तसेच २)राजेश वसंतलाल जैस्वाल वय २६ वर्षे, राहणार अंधेरी पाईपलाईन, अंधेरी, मुंबई या दोघांना अटक करून त्यांच्याकडून सोनी कंपनीचा मोबाईल हस्तगत केला.
पोलीस उपनिरीक्षक चौधरी व गुन्हे प्रकटीकरण पथकाला गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीवरून दोन संशयित इसमाना सापळा लावून पकडले असता त्यापैकी एका आरोपीकडे अंगझडती पंचनाम्यातर्गत नमुद गुन्हातील चोरी गेलेला सोनी कंपनीचा मोबाईल मिळून आला तसेच दुसया आरोपीकडे एक चोरीचा सॅमसंग कंपनीचा मोबाईल मिळून आला. दोन्ही गुन्हेगारांवर एमआयडीसी पोलीस ठाणे तसेच इतर पोलीस ठाणेत विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल आहेत.सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक चौधरी पो.ह. शिंदे किंद्रे, ठाकूर, पो.नाईक मांडेकर, सोनावणे अशी माहिती निर्मल नगर पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत भंडारे यांनी दिली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा