Ticker

6/recent/ticker-posts

सुरक्षेचे नियम पाळा

मुंबई, दादासाहेब येंधे : राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. आपण सध्या लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर असलो, तरी सुरक्षेच्या त्रिसूत्रीचे पालन आपल्याला करावेच लागेल. नियम पाळून आपण हा लॉकडाऊन निश्चितच टाळू शकतो, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोशल मीडिया लाईव्हच्या माध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधला आणि कोरोना तसेच लॉकडाऊनबाबत सुरू असलेल्या चर्चेवर आपली भूमिका स्पष्ट केली. लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे. मात्र, लसीकरण केले तरी मास्क लावावेच लागेल. 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या