रहिवासी गाढ झोप येत असताना काळाचा घाला

मुंबई, दि. ८ : गोरेगाव पश्चिम येथील जय भवानी या सात मजली एसआरए इमारतीला पहाटे पावणेतीन वाजता लागलेल्या आगीत ७ जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना काल घडली. मृतांमध्ये एक महिला, दोन तरुण, एक अल्पवयीन मुलगी, एक साडेतीन वर्षांची मुलगी आणि दोन पुरुषांचा समावेश आहे. या दुर्घटनेत एकूण ५१ जण जखमी झाले असून पाच जणांची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींवर पालिकेच्या हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि कूपर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
0 टिप्पण्या