मुंबई, दि. १० : गेल्या महिन्यात साकीनाका पोलिसांनी अन्वर सय्यदला अटक करून त्याच्याकडून १० ग्रॅम एमडी जप्त केले होते. त्याच्या चौकशीत जावेद खान, आसिफ शेख आणि इकबाल अलीचे नाव समोर आले. पोलिसांनी धारावी येथे छापा टाकून त्या तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ९० ग्राम एमडी जप्त केले. त्या तिघांची पोलीस चौकशी केली चौकशीनंतर पोलिसांनी सुंदर शक्तीवेल, हसन शेख, आयुब सय्यदला ताब्यात घेऊन त्यांच्याकडून १० ग्राम एमडी जप्त केले. पोलिसांनी नंतर हसनची चौकशी केली. धारावी येथे राहणाऱ्या हसन कडून तो ड्रग्स खरेदी करत असल्याचे समजले. त्यानंतर पोलिसांनी धारावी येथून हसनलादेखील अटक केली. हसनच्या चौकशीत आरीफचे नाव समोर आले. आरिफ हा हैदराबादला असल्याची माहिती मिळाली. त्या माहितीनंतर साकीनाका पोलिसांचे पथक हैदराबाद येथे गेले. तेथून पोलिसांनी आरिफला ताब्यात घेतले. त्याच्याकडून ११० ग्रॅम एमडी आणि गावठी कट्टा, सात जिवंत काडतुसे आणि चार लाख रुपये जप्त केले.

आरिफ हा जे.जे. मार्ग येथे राहणाऱ्या नासिर शेख उर्फ चाचाकडून एमडी घेत असल्याचे समजले. पोलिसांनी जे. जे. येथे सापळा रचून चाचाला ताब्यात घेतले. त्याच्याकडून १ किलो २५० ग्रॅम एमडी जप्त केले. पोलिसांनी शेखची देखील चौकशी केली. तो ते एमडी ड्रग्स कल्याण फाटा येथे राहत असलेल्या रिहान अन्सारी याकडून घेत असल्याची माहिती मिळाली. पोलीसांनी शीळफाटा येथून रिहान अन्सारी आणि असमत अन्सारीला ताब्यात घेऊन त्यांच्याकडून १५ किलो एमडी जप्त केले. त्याबाबत पोलिसांनी रिहानशी चौकशी केली.
रेहानच्या चौकशीत जिशान शिक्षणाव शेखचे नाव समोर आले. जिशान हा नाशिक येथून ते एमडी आणत असल्याचे उघड झाले. जिशानच्या अटकेसाठी पोलिसांनी खास प्लान तयार केला. परिमंडळ-१० चे पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे यांनी अधिकाऱ्यांना तपासाच्या सूचना दिल्या. वरिष्ठ पोलीस निरीक्षक गबाजी चिमटे यांच्या पथकातील पोलीस निरीक्षक योगेश शिंदे, सहाय्यक निरीक्षक मैत्रानंद खंदारे आदी पथकाने तपास सुरू केला. पोलिसांचे पथक नाशिकच्या शिंदे एमआयडीसी येथे गेले. त्या कारखान्यात पोलिसांनी छापा टाकून जिशान शेखला ताब्यात घेतले. त्याच्याकडून १३३ किलो एमडी जप्त केले. साकीनाका पोलिसांनी यंदाच्या वर्षातील ही मोठी उत्कृष्ट अशी कारवाई केली आहे.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा