Ticker

6/recent/ticker-posts

नाव मिठाईचे, काम फसवणुकीचे

२२ दिवस थांबून आरोपींना घेरले; 
८ गुन्ह्यांची उकल


मुंबई, दि. ७ : दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थानमध्ये २२ दिवस थांबून पथकाने गूगलवरून स्वीट्स शॉपच्या नावाने बनावट वेबसाईट द्वारे फसवणूक करणाऱ्या टोळीला अटक केली आहे. 

गावदेवी पोलीस ठाण्यातील ८ गुन्ह्यांची उकल करण्यात पथकाला यश आले आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील एका सुप्रसिद्ध स्वीट्स शॉपच्या नावाने बनावट वेबसाईट तयार करून त्याद्वारे सामान्य नागरिकांना मिठाई घरपोच देण्याचा बहाणा करून लाखो रुपये उकळणाऱ्या टोळीविरुद्ध गावदेवी पोलीस ठाण्यात ८ गुन्हे दाखल करण्यात आले होते. या गुन्ह्यांच्या तांत्रिक माहितीच्या आधारे स्पेशल सायबर सेल-२ मधील स.पो.नि. शिंदे यांनी संबंधित स्वीट शॉपचे बनावट वेबसाईट तयार करणाऱ्या राहुल डोंगरा याची माहिती मिळवली. आरोपी हा त्याच्या राहण्याचे ठिकाण वारंवार बदलत असताना गोपनीय व तांत्रिक माहितीच्या आधारे सापळा रचून त्याला आग्रा, उत्तर प्रदेश येथून ताब्यात घेतले. त्याच्या चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली.


राहुल डोगरा याला अटक करून ट्रांजिस्ट रिमांडद्वारे मुंबईत आणले गेले. सायबर गुन्ह्यातील आरोपी हे अधिकृत वेबसाईट सारख्या बनावट वेबसाईट तयार करून सर्च इंजिनला अधिकृत वेबसाईटच्या आधी बनावट वेबसाईट दिसेल या प्रकारे कोडींग करतात. त्यामुळे कोणीही सर्च करत असताना त्यांची वेबसाईट आधी नजरेस पडते. 


आरोपीने तयार केलेली वेबसाईट हटवत त्याला गुन्ह्यात अटक करण्यात आली. त्या पाठोपाठ अन्य गुन्ह्यातील आरोपीला ग्वाल्हेर येथून अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून याबाबत अधिक माहिती उघड होण्याची शक्यता आहे.



2204

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या