मुंबई, दि. २२ : पूर्वेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे कोकण विभागात कमाल तापमानात मोठी वाढ झाली असून शनिवारी मुंबईचे कमाल तापमान ३७ अंशापार नोंदले गेले. सांताक्रूझ येथे ३७.४, तर कुलाबा येथे ३५ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. हवेतून आर्द्रता कमी असून दिवसभर उन्हाचा ताप मुंबईकरांनी अनुभवला. शुक्रवारपेक्षा शनिवारी सांताक्रूझ येथे १.५ अंशांनी तापमान अधिक होते. हे तापमान सरासरीपेक्षा तब्बल ३.५ अंशांनी अधिक होते. वाढलेल्या तापमानामुळे मुंबईकरांना डोकेदुखीपासून, डोळे चुरचुरण्याच्या त्रासाला सामोरे जावे लागले. कुलाबा येथे शुक्रवारपेक्षा शनिवारी ०.५ अंशांनी तापमान अधिक तर सरासरीपेक्षा १.७ अंशांनी कमाल तापमानवाढ नोंदली गेली.
0 टिप्पण्या