नेहरुनगर पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी
मुंबई दि. २३ : दोन अनोळखी आरोपींनी आपापसात संगनमत करून तक्रारदार श्रीमती प्रतिभा प्रकाश कदम वय (५५ वर्षे) रा ठी - साई जागृती को.ऑप हौ. सोसायटी, बिल्डिंग नंबर १२/४२६ रुणवाल म्हाडा कॉलनी चेंबूर मुंबई यांना मावशी कुर्ला येथे जायला कोणता रस्ता आहे असे विचारून सोन्याच्या मण्याची माळ अंदाजे किंमत ५०,००० जबरीने खेचून पळून गेले म्हणून गुन्हा नोंद करण्यात आला होता.

मा. अप्पर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, मुंबई, श्री विनायक देशमख सो, मा. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ०६, मुंबई, हेमराजसिंह राजपूत, मा. सहाय्यक सहाय्यक पोलीस आयुक्त नेहरु नगर विभाग, श्री शशिकांत भंडारे. सो, यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री युसूफ सौदागर सो, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री राजेंद्र ठीकेकर यांनी दिनांक १७ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी पंतनगर पोलीस ठाणे हद्दीत चैन स्नॅचिंग ची घटना घडली असून चैन स्नॅचिंग करणारा इसम काळ्या रंगाच्या स्कुटीवर पळून गेला असल्याबद्दल पूर्व नियंत्रण कक्ष येथून संदेश प्राप्त होताच नाकाबंदीचे आयोजन करण्यात आले. सदरची घटना घडताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक नेहरू नगर पोलीस ठाणे यांना त्यांच्या हद्दीत घडलेली चैन चोरीची घटना ही काळ्या रंगाच्या स्कुटी चालकाने केल्याचे माहित होते व त्यावर गुन्हे प्रकटीकरण पथकाने अकरा दिवस काम केल्याने तसेच वेगवेगळ्या ठिकाणचे २००० हून अधिक सरकारी व खाजगी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासल्याने सी सी टी वी फुटेज मध्ये आरोपींचा फोटो त्याने वापरलेल्या स्कूटी सह दिसून आल्याने आरोपीची ओळख पटली होती. त्यामुळे व पो नि नेहरू नगर यांनी सदरची माहिती गुन्हे प्रकटीकरण अधिकारी सपोनि मोरे यांना दिली व त्यांना व स्टाफला कार्यान्वित केले.
आरोपीला पकडण्याच्या अनुषंगाने ऐरोली चेक नाका या ठिकाणी पो शि ०९२५०३/ स्वप्नील वानखेडे व पो शि ०९३४८३/ निखिल वाघमोडे यांना निगराणी साठी तैनात केले, तसेच वाशी चेक नाका या ठिकाणी सपोनि. मोरे. व पो शि १४१२८७/ दिलीप गव्हाळे. स्टाफसह तैनात होते. तसेच पो.ह. ३०६०१/ सुनील भोसले. व पो.ह. ०४०७१५/ अजित कावळे. यांना मुंब्रा येथे तैनात केले. ऐरोली चेक नाका येथे ११.०५ वा. चे सुमारास आरोपी दिसून आला व तो नवी मुंबईच्या दिशेने पळून जात होता. स्वप्नील वानखेडे व निखिल वाघमोडे यांनी त्याचा पाठलाग केला व सपोनि मोरे यांना अलर्ट केले. आरोपी नवी मुंबईहून वाशीच्या दिशेने वाशी चेक नाका येथे आला असता सपोनी मोरे व स्टाफला हुलकावणी देऊन मुंबईच्या दिशेने पळू लागला. सपोनी मोरे यांनी रस्त्यावरील जाणाऱ्या एका बाईक स्वारास थांबवून आरोपीचा पाठलाग सुरू केला व त्याला मानखुर्द पुलावर अडवले व त्यास पकडले. तोपर्यंत इतर स्टाफ मागून आला व आरोपीला ताब्यात घेतले. आरोपीला पोलीस ठाण्यास आणले असता त्याने पंतनगर पोलीस ठाणे येथे चैन स्नॅचिंग केल्याचे कबूल केले व त्याच्याजवळ अंग झडतीत पंतनगर पोलीस ठाणे हद्दीत चोरी केलेली सोन्याची चैन मिळून आली. तसेच आरोपीकडे स्वतः वपोनि व स्टाफ यांनी चौकशी केली असता त्यांनी पाच ते सहा ठिकाणी चैन स्नचिंग केल्याची कबुली दिली. त्यामध्ये त्यांनी नेहरूनगर पोलीस ठाणे, नवघर पोलीस ठाणे, पंतनगर पोलीस ठाणे या ठिकाणी सोनसाखळी खेचून चोरी केल्याचे कबूल केल्याने पुढील तपास नेहरू नगर पोलीस ठाणे करत आहे. पकडण्यात आलेल्या आरोपींची नावे १) मोहम्मद अफजल शौकत अली कुरेशी, ( वय ४२ वर्षे) रा ठि:-बंदूक वाला बिल्डिंग, चिंचबंदर, जे जे मार्ग, मुंबई. २) रहमतुल्ला अफजल कुरेशी (विधी संघर्षग्रस्त बालक) अशी आहेत. त्यांनी गुन्ह्यात वापरण्यात आलेली काळ्या रंगाची मो/स्कुटर ताब्यात घेण्यात आलेली आहे. त्यांचे नेहरू नगर पोलीस ठाणे, नवघर पोलीस ठाणे, पंतनगर पोलीस ठाणे असे तीन इतर पोलीस ठाणेतील गुन्हे यामुळे उघडकीस आले आहेत.
सदर गुन्हा सपोनि भूषण मोरे, पो ह क्र ३०६०१/सुनील भोसले, पो ह क्र ०३ २२८/श्री हरी कसबे, पो ह क्र ०४ ७१५/अजित कावळे, पो शि.०९ २५०३/ स्वप्नील वानखेडे, पो शि ०९ ३४८३/निखिल वाघमोडे, पो शि १४०६७९/संदीप पाचुपते, पो शि १४२२८७/दिलीप गव्हाळे यांनी उघडकीस आणला. अशी माहिती नेहरू नगर पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक युसूफ सौदागर यांनी दिली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा