मुंबई, दि. १३ : स्वच्छ मुंबई स्वच्छ भारत अभियान अंतर्गत घाटकोपर पोलीस ठाणे स्वच्छतेची शपथ घेत पोलिसांनी ठाण्याच्या आवाजातील परिसर नुकताच स्वच्छ केला. पोलीस उपायुक्त पुरुषोत्तम कराड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय डहाके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुशांत बंडगर, प्रमोद कोकाटे यांच्या वतीने महिला पोलीस, हवालदार, सफाई कर्मचाऱ्यांनी स्वच्छतेची शपथ घेत मोहिमेला सुरुवात केली. सकाळी दहा ते बारापर्यंत हे अभियान राबवण्यात आले.
१ ते ३१ डिसेंबर दरम्यान शहरात महास्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर शहरात सार्वजनिक ठिकाणी रस्ते, रुग्णालय, पोलीस ठाणे, प्रार्थनास्थळे, सोसायटी आदी ठिकाणी स्वच्छता मोहीम घेण्यात येत आहे. नुकतेच घाटकोपर मधील चिराग नगर पोलीस ठाण्यात पोलीसांनी आपला परिसर स्वच्छ करत या अभियानात सहभाग नोंदवला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा